प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे एक महत्त्वाचे अंग बनलेले आहे. जे जे सौंदर्य पूर्ण व कलात्मक तेथे मानव आकर्षीला जातो. मानवाची दृष्टी जेव्हा कलेने किंवा सौंदर्याने भरून जाते दृष्टी जेव्हा तो कलेचा भोक्ता होतो. आपल्या पुणे शहरामध्ये कलेला प्राधान्य देणारे, कलेचे भोक्ते असलेले रसिक आहेत. वर्षभर पुण्यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्याचा चोखंदळ असलेले पुणेकर रसिक लाभ घेतात.
गेली पाच वर्षे पुण्यामध्ये आयोजित होणार ‘मित्र महोत्सव’ या वर्षी दिनांक २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी पंडित फार्म्स येथे आयोजित केला गेला होता. पहिल्या दिवशी दिनांक २६ नोव्हेंबर रोजी महोत्सवाची सुरुवात सितार वादक, सुज़ात खा यांच्या सुरेल वादनाने झाली. सुज़ात खा यांनी शुद्ध कलयाण या सायंकाळच्या रागानी महोत्सवाचा शुभारंभ केला आणि सगळे वातावरण सुरेल होऊन गेले. त्यानंतर त्यांनी एक सुंदर गझल पेश केली. ‘तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना है, मै एक शाम चुरा लू अगर बुरा ना लगे’ आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन झाले. सुरुवातीला त्यांनी पुरिया रागातील बंदिश गायली. त्यानंतर दुर्गा रागातील बंदिशींनी पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
रविवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी बासरीवादक राकेश चौरासिया आणि प्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील या दोघांचे सादरीकरण झाले. पहिल्या सत्रामध्ये राकेश चौरासिया यांच्या बासरीच्या सुमधुर वादनाने सायंकाळ सुरेल होऊन गेली. त्यांना तबल्यावर सत्यजित तळवलकर यांनी साथ संगत केली. अतिशय मधूर स्वरांचा मारवा रागाने चौरासिया यांनी आपल्या वादनाची सुरुवात केली. त्यानंतर संध्याकाळचे असलेले राग कलारंजनी आणि राग दुर्गा या रागांमध्ये बांधलेल्या काही बंदिशी वाजवल्या. त्यानंतर रसिक प्रेक्षकांनी बासरी आणि तबल्याची बंदीचा जुगलबंदीचा आस्वाद घेतला आणि टाळयांच्या कडकडाट पहिले सत्र संपले.
या बहारदार सत्रानंतर सुप्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील यांचे गायन झाले. ग्वाल्हेर घराण्याच्या असलेल्या मंजुषा पाटील या संगीत विशारद आहेत. त्यांनी सुरुवातीला यमन रागमधील दोन बंदिशी अतिशय सुरेख रित्या सादर केल्या. यमन नंतर त्यांनी राग सोहनी आळवला. आपल्या आक्रमक गायनासाठी प्रसिद्ध आहेत आणि याच शैलीमध्ये त्यांनी ‘जोहार मायबाप जोहार’ हे संत चोखामेळा यांचे भक्तीगीत सादर केले आणि प्रेक्षकांना भारावून टाकले.